Are you need IT Support Engineer? Free Consultant

फेबर इन्फनिट… परिपूर्ण मॅनेजमेन्ट सोल्युशन

  • By Faber Infinite
  • May 3, 2016

थ्री इंडियट या सिनेमात अभियांत्रिकी शाखेत शिकत असलेल्या तीन मित्रांची गोष्ट दाखवण्यात आलीय. सिनेमात एक संदेशही देण्यात आलाय ‘कामयाब नही, काबील बनो, कामयाबी अपने आप आपके पिछे दोडते हुए आएगी.’ रंचो शामलदास छांछड, राजू रस्तोगी आणि फरहान कुरेशी या तीन मित्रांची गोष्ट अनेकांच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेली. काबील बनण्यासाठी प्रत्येकजण धडपडू लागला. आपल्या आसपास जे घड़तं तेच सिनेमातून येतं. आणि जेव्हा सिनेमात ते दिसतं त्याचा परिणाम जास्त व्यापक होतो. फेबर इन्फनिटच्या बाबतीतही असंच घडलंय. इंजिनियरींग केलेल्या तीन मित्रांनी यंत्रांच्या जगात न जाता व्यवस्थापनाचा मार्ग निवडला. जास्त ‘काबील’ बनण्यासाठी. आता फेबर इन्फनिटची व्याप्ती जगभर पसरली आणि जेव्हा हे तीन मित्र म्हणजेच विशाल कुलकर्णी, जलय पांडा आणि आकाश बोरसे मागे वळून पाहतात तेव्हा त्यांना आपण खरंच काबील बनण्याच्या मार्गावर खूप पुढे आल्याचं जाणवतं.

फेबर इन्फनिट ही मॅनेजमेन्ट कन्सल्टींग कंपनी आहे. २०१२ मध्ये या तीन मित्रांनी ही कंपनी सुरु केली आणि गेल्या चार वर्षात या कंपनीनं आपले पंख जगभरात पसरवले. फेबर म्हणजे लॅटीन भाषेत कारागिरी किंवा कसब. फक्त बोर्डरुम सोल्युशन न देता कंपनीचा सर्वांगिण विकास करण्यासाठी ही कंपनी काम करते. क्लायंटची क्षमता लक्षात घेता त्याच्या व्यवस्थापनाच्या योजनांची आखणी करुन विकास आणि नव्या क्षेत्रातल्या त्याच्या वाटचालीची दिशा ठरवणं म्हणजे क्लायंटची कारागिरी करणं. आणि इन्फनिट म्हणजे अगणित… यशाच्या मार्गावर सतत कार्यरत राहण्यासाठी क्लायंटला सर्वतोपरी मदत करणे म्हणजे त्याच्या मोठ्या यशाचा मार्ग तयार करणे. फेबर म्हणजे कारागिरी आणि इन्फनिट म्हणजे अगणित या दोन्ही शब्दांना एकत्र आणून फेबर इन्फनिटची स्थापना झाली. फेबर इन्फनिटचं महत्त्वाचं कार्य म्हणजे क्लायंटची परिणामकारक, प्रभावी प्रगती साधणं आणि यात ते यशस्वीही झालेत.

या तीनही मित्रांनी इंजिनियरींग संपल्यावर व्यवस्थापनाचा मार्ग पत्करला. कंपनीची स्थापना केल्यानंतर कामाची विभागणीही करण्यात आली. या तिघांपैकी दोघेजण जगभरात पसरलेल्या आपल्या क्लायंटला मार्गदर्शन  करतात तर तिसरा संयुंक्त ऱाष्ट्र संघासोबत काम करुन  पूर्व अफ्रिकेत कंपनीच्या विस्ताराची धुरा सांभाळत आहे.

विशाल कुलकर्णी यांनी सांगितलं की आम्ही आमच्या क्लायंटला संपूर्ण सोल्यूशन देतो. कंसल्टंसी हा परिपूर्ण पर्याय नाही. होय तो महत्वाचा आहे. पण आजच्या जगात आमच्या क्लायंटला पूर्णपणे विस्तार करायला मदत करणं हे आमचं ध्येय आहे. आणि ते साधण्यात आम्ही यशस्वी झालोय हे महत्वाचं आहे. असं आम्हाला वाटतंय. आम्ही आमच्या कंपनीचा पुढच्या १५ वर्षांचा आराखडा बनवलाय. त्यानुसार आमची वाटचाल सुरु आहे.

सध्या फेबर इन्फनिटचं लक्ष हे टीअर  टू टीअर थ्री शहरातले उद्योजक आहेत. ज्यांनी आपला व्यवसाय सुरु केला. एक ध्येय गाठलंही आता त्याचा विस्तार आणि कॉर्पोरेट मॅनेजमेन्टमध्ये फेबर इन्फनिट मदत करतेय. “ या शहरातल्या उद्योजकांमध्ये सकारात्मकता आहे. एकूणच पुढे जाण्याची धडपड आहे. ते कुठे कमी पडतायत याची पडताळणी आम्ही करतो आणि त्यानुसार त्यांच्या कंपनीच्या पुढच्या वाटचालीची आखणी करुन देतो.” जयल पंड्या सांगत होते.

कंपनी छोटी असो वा मोठी तिच्या प्रगतीसाठी, सर्वांगिण विकासासाठी उद्योजक दिवसरात्र मेहनत करत असतात. त्यांची ही मेहनत थोडीशी सुकर करण्याचा फेबर इन्फनिटचा प्रयत्न आहे. कंपनीची सध्या देशात पुणे अहमदाबाद आणि बडोदा अशा तीन ठिकाणी कार्यालयं आहेत. १० जणांचा स्टाफ सतत कार्यरत असतो. कंपनीचा विस्तार भारताबाहेर केनिया, गल्फ, टांझानिया, युगांडा आणि झांबीयामध्ये झालाय.

Published By YourStory. Article available here